कपिल वस्तू नगरात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अमरावती :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी ३९५ वी जयंती स्थानिक कपिल वस्तू नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रयतेचे थोर कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदन करून मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा प्रसंग दर्शविणारा पाळणा यावेळी लक्षवेधी ठरला. तर युवतींनी महाराजांचा पोवाडा सादर करून शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची गाथा विशद केली. दरम्यान पत्रकार अमित तायडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकला. अनेक गड -किल्ले काबीज करून स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या राज्यकारभारातील धोरण हे लोककल्याणकरि होतो, स्त्रियांचा आदर व सामान वागणूक, धर्मनिरपेक्षता ,न्यायप्रियता, त्यांची आर्थिक नीती, व सामाजिक विचार हेच राष्ट्र निर्मितीच्या उभारणीसाठी महत्वपूर्ण ठरले. त्यामुळे देशहिताच्या विधायक कार्यासाठी आजच्या तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा. जयंती निमित्त केवळ साजरीकरणामध्ये दंग न राहता छत्रपती शिवरायांच्या विचारांनुसार आचरण करण्याच्या प्रयत्न केल्यास महाराजांना अपेक्षित असणारा समाज आपण घडवू शकतो. असे मनोगत पत्रकार अमित तायडे यांनी व्यक्त केले. यावेळी महिलांचा पारंपरिक पेहराव, बालकांच्या विविध वेशभूषा सुद्धा लक्षवेधी ठरल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कि जय… जय भवानी, जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय.. जय जिजाऊ जय शिवराय.. अशा गगनभेदी घोषणांनी कपिल वस्तू नगर दणाणून गेले होते. शिवजयंतीच्या कार्यक्रमाला दिलीप डीवरे, विक्की लोणकर, मदन धानोरकर , राजेश नांदुरकर,प्रदीप वडतकर, अनिल सरोदे, सौ. ज्योती चोंदे , रेखा रनमोरे, ज्योती अवघड, स्नेहा चोंदे, पूनम वडतकर,आराध्या वडतकर,वैष्णवी डिवरे, ज्योती डिवरे, सोनाली नांदुरकर, नीता डिवरे,मेघा रायकवार, प्रियंका रनमोले आदींसह स्थानिक नागरिक व शिवप्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.