गो. से. महाविद्यालयामध्ये संख्याशास्त्र विभागातर्फे सेमिनार आयोजित

बुलढाणा, खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2024 ला संख्याशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांकरिता Developing Analytical Skill and Career Opportunities in Statistics या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला. या विषयावर बोलणाऱ्या व्यक्ती ह्या , याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी प्रांजली सोनवणे, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर ह्या होत्या. सुरुवातीला संख्याशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विद्याधर आठवर यांनी पाहुण्यांचा सत्कार व परिचय करून दिला, यावेळी गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सचिन शिंगणे सर यांच्या हस्ते कुमारी प्रांजली सोनवणे यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कुमारी प्रांजली सोनवणे यांनी संख्याशास्त्र विषयामध्ये विविध ठिकाणी रिसर्च असोसिएट्स म्हणून नामांकित, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पोपुलेशन सायन्स मुंबई तसेच नागपूर येथील नामांकित इन्स्टिट्यूट निरी या ठिकाणी त्यांनी जे. आर एफ या माध्यमातून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या संधीचा फायदा त्यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होईल दृष्टिकोनातून हा सेमिनार आयोजित करण्यात आला. त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये काम केलेले अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पुढे प्रात्यक्षिक करून त्यांना समजावून सांगितले व आपल्या विषयाचा ठसा इतर क्षेत्रांमध्ये कसा आपण उमटू शकतो याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच संख्याशास्त्र या विषयांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी तसेच नोकरी कशाप्रकारे मिळवता येईल यात वर देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळे करिता 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळे करिता बी.एस.सी द्वीतीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळे चे आभार प्रदर्शन कुमारी रुचिता काळे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. धनंजय तळवणकर व संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रफुल्ल उबाळे यांनी प्रोत्साहन केले तसेच संख्याशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मधुकर वानखडे, सहाय्यक नितेश मोरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.
माननीय संपादक / जिल्हा प्रतिनिधी वरील बातमी फोटोसह आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द़ करुन उपकृत करावे ही विनंती.