श्री संत गजानन महाराज प्रगटदिन विशेष: 24 तास दर्शनाची सोय!

श्री संत गजानन महाराजांचा 147 वा प्रगटदिन उत्साहात साजरा होत आहे! यंदा 20 फेब्रुवारी रोजी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने संस्थानने मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सोहळ्यासाठी संपूर्ण शेगाव शहर भक्तिमय झाले आहे. अधिक माहिती सविस्तर पाहूया
श्री संत गजानन महाराज प्रगटदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातसह देशभरातील आणि परदेशातील हजारो भक्त शेगावी दाखल झाले आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी संस्थानने विशेष उपाययोजना केल्या असून, एकेरी दर्शनबारी, महाप्रसाद, भक्तनिवास, औदुंबर दर्शन, तसेच स्वच्छता व्यवस्था केली आहे.
प्रगटदिनानिमित्त हभप भरत बुवा पाटील यांच्या किर्तनासोबत महारूद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती संपन्न होणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता होईल. भक्तांचा उत्साह, दिंड्यांचे आगमन आणि संपूर्ण शहरात निर्माण झालेले भक्तिमय वातावरण यामुळे शेगाव आजही आध्यात्मिक ऊर्जा अनुभवत आहे!
श्रींच्या प्रगटदिन निमित्ताने भाविकांसाठी संस्थानने विविध सुविधा पुरवल्या असून, 24 तास दर्शन खुल्या ठेवण्याचा निर्णय भाविकांना निश्चितच आनंद देणारा आहे. शेगावी दाखल झालेले भक्त मोठ्या श्रद्धेने श्रींच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी जोडले राहा आमच्यासोबत!