LIVE STREAM

Accident NewsLatest NewsNagpur

6 फूट लांब विषारी कोब्रा घरात शिरल्याने रहिवाशांची झोप उडाली

नागपूर :- नागपूरच्या बेसा परिसरात एका घरात 6 फूट लांब विषारी नाग कोब्रा शिरल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली. मात्र, सर्पमित्र शुभम पराळे यांनी धाडसाने हा साप सुरक्षितरीत्या ताब्यात घेतला. काय आहे संपूर्ण घटना, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट!

बेसा पोस्ट ऑफिसच्या मागे असलेल्या धर्माधिकारी यांच्या घरात रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी अचानक 6 फूट लांब कोब्रा शिरला. घरातील सदस्य घाबरले, मात्र सर्पमित्र शुभम पराळे यांनी धाडसाने सापाला शोधून त्याचे नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्याची प्रक्रिया केली.

या घटनेत सर्पमित्र शुभम पराळे यांनी दाखवलेल्या धाडसाचे परिसरातील नागरिकांनी भरभरून कौतुक केले आहे. वनविभागाच्या मदतीने साप लवकरच निसर्गमुक्त होणार आहे. साप दिसल्यास घाबरू नका, त्वरित सर्पमित्रांना संपर्क साधा!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!