अंगणवाडी सेविकांच्या संतापाचा विस्फोट!

सरकारकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे आज अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षकांनी संतापाच्या तीव्र लाटेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले! पेंशन, ग्रॅज्युएटी, एकरकमी लाभ आणि शासकीय दर्जा यांसारख्या मागण्यांकडे सरकार डोळेझाक करत असल्याचा आरोप करत संतप्त अंगणवाडी सेविकांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. मागण्या मान्य नाही झाल्या तर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे! या आंदोलनाच्या ठिकाणी नक्की काय घडलं .
आज संपूर्ण जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांचा संताप अनावर झाला! पोटच्या पोरांसारखी बालके सांभाळणाऱ्या या सेविकांना न्याय देण्याऐवजी सरकारकडून केवळ कामांचा बोजा टाकला जातोय. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे काम अंगणवाडी सेविकांवर जबरदस्ती टाकले जात आहे, पण त्याचा मोबदला मात्र ठेंगणाच! सेविका आणि मदतनीस यांना पूर्ण वेळ काम करूनही शासकीय दर्जा नाही, पेन्शन नाही, ग्रॅज्युएटी नाही, आणि सेवानिवृत्तीच्या वेळी केवळ रिकाम्या हाताने पाठवले जाते! 65 वर्षावरील सेवानिवृत्त सेविकांना किमान 10 लाख रुपयांचा एकरकमी लाभ मिळावा, या मागणीसाठी अंगणवाडी सेविका रणशिंग फुंकत आहेत.
आम्ही दिवस-रात्र झटतोय, गरीब कुटुंबातील मुलांचं पोषण करत असतो, आरोग्याची काळजी घेतो, पण सरकार आमच्याकडे केवळ सवंगडी मजुरांसारखी वागणूक देतंय! आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन हवी, ग्रॅज्युएटी हवी, आणि शासकीय दर्जा मिळाला पाहिजे!” अशी मागणी यावेळी आलोकांनी केली.
“आजचं आंदोलन हे केवळ सुरुवात आहे! सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर याहून अधिक तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सेविकांनी दिला आहे! आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे!
अंगणवाडी सेविकांच्या या संघर्षाकडे सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेणार? त्यांची मागणी पूर्ण होईल का? की फक्त आश्वासनांची बोळवण केली जाईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे! जर सरकारने दखल घेतली नाही, तर अंगणवाडी सेविका अधिक आक्रमक आंदोलन उभारणार, याबाबत कोणतीही शंका नाही! यावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा! पाहत राहा City News!