अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या सभापती प्रतिभा ठाकरे!

अचलपूर :- अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिला राज सहकार पॅनलच्या प्रतिभा प्रशांत ठाकरे यांची सभापतीपदी निवड झाली आहे, तर उपसभापती म्हणून अमोल चिमोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे बाजार समितीच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे. पाहूया संपूर्ण बातमी!
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा राजकीय उलथापालथ! माजी सभापती राजेंद्र गोरले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली. सहकार पॅनलतर्फे सौ. प्रतिभा प्रशांत ठाकरे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली असून, उपसभापतीपदी अमोल चिमोटे यांची निवड झाली आहे. या निर्णयामुळे बाजार समितीच्या राजकारणाला नवा रंग चढला आहे!
तर अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. नव्या नेतृत्वामुळे कृषी बाजारपेठेच्या कारभारात काय बदल होतील, याकडे सगळ्यांचे लक्ष राहील.