खोलापूर-वाठोडा शुक्लेश्वर मार्गावर पिकअप वाहनाचा अपघात

खोलापूर :- आजच्या मुख्य बातम्यांमध्ये खोलापूर-वाठोडा शुक्लेश्वर मार्गावर घडलेल्या अपघाताची मोठी बातमी आहे. महिंद्रा सुप्रो पिकअप वाहनाचा टायर फुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून नागरिकांनी तातडीने मदत केली आहे. पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट.
खोलापूर-वाठोडा शुक्लेश्वर मार्गावर एका महिंद्रा सुप्रो पिकअप वाहनाचा टायर फुटल्याने मोठा अपघात घडला आहे. पेंटचे डबे वाहून नेणारे हे वाहन वळणावर पलटी झाल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली.
अकोल्याहून वाठोडा शुक्लेश्वर येथे पेंटचे डबे घेऊन निघालेल्या वाहनाचा टायर अचानक फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. या अपघातात अंकुश जाधव आणि सुरज जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने उलटलेले वाहन सरळ करण्यात आले. या घटनेने रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.