गवंडीच्या प्रेमात बुडाली, नवऱ्याला संपवण्याचा कट आखला; आधी झोपेच्या गोळ्या दिल्या, मग जिवंत जाळले

उत्तरप्रदेश :- अनैतिक संबंधामुळे पत्नीने पतीची आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केली आहे. नंतर पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्यात आला आहे. सुरुवातीला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने शत्रुत्वातून त्याची हत्या केल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, तपास केला असता खळबळजनक बाब उघडकीस आली. या धक्कादायक घटनेनंतर उत्तर प्रदेशातील मैनपुरी हादरलं आहे. पत्नीचा प्रियकर आरोपी सुमित (वय वर्ष २५) हा व्यवसायाने मिस्त्री आहे.
हे सर्व प्रकरण उत्तर प्रदेशातील मैनपुरीच्या बिछवान पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. यात पती साजिदची हत्या करण्यात आली आहे. खरंतर, साजिदची पत्नी आमना हिचे सुमितसोबत अफेअर होते. साजिदला याची कल्पना आली होती. यामुळे, आमना आणि सुमितने साजिदच्या हत्येचा कट रचला.
साजिदचे गावप्रमुख भोला यादव यांच्या कुटुंबाशी वैर होते आणि त्यांच्यावर न्यायालयीन खटलाही सुरू होता. त्यामुळे साजिदच्या हत्येनंतर भोला आणि त्याच्या कुटुंबावर आरोप त्यांनी केले होते. भोलाची चौकशी केली असता, त्याच्याकडून कोणतेही माहिती अथवा पुरावे सापडले नाही.
तेव्हा साजिदची पत्नी हिचा पोलिसांनी मोबाईल तपासला. तेव्हा आमना ही सतत सुमितला कॉल करत असल्याचं आढळलं. तेव्हा संशयाची सुई अर्थात पत्नीकडे फिरली. पोलिसांनी आमना आणि सुमीतची चौकशी केली असता, त्यांनी हत्येची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारीच्या रात्री पत्नीने साजिदच्या चहा आणि जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. यानंतर, साजिदच्या डोक्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यावर पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्यात आला. सुमितच्या ताब्यातून पोलिसांनी एक लोखंडी रेंच, एक प्लास्टिकची बाटली, ६ झोपेच्या गोळ्या आणि एक मोबाईल फोन जप्त केला.