धारणीतील गजानन महाराज मंदिरात हजारोंना महाप्रसादाचा लाभ

धारणी :- धारणीतील सुप्रसिद्ध गजानन महाराज मंदिरात काल प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पारायन, भजन-कीर्तन, महाआरती आणि महाप्रसाद अशा भक्तीमय वातावरणाने मंदिर परिसर गजबजून गेला. या विशेष सोहळ्याचा संपूर्ण अहवाल पाहूया.
काल गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त धारणी येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच पारायन, भजन आणि कीर्तनाने भक्तिमय वातावरण तयार झाले. दुपारी 12 वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली आणि रात्री 10 वाजेपर्यंत हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला. संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला.
यावेळी मंदिर कमेटीचे प्राचार्य सोनवणे सर, विजयपाल कडु, पंकज माकोडे, युगंधर सोनवणे, बंटी ठाकरे, दिलीप गावंडे, गजु थोरात, सुनील चौथमल, कपील ठाकुर, परीहार बंधू तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.
गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने धारणी येथे झालेल्या या भक्तिमय सोहळ्यात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. मंदिर कमेटीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. अशाच भक्तिरसात न्हालेल्या अधिक अपडेट्ससाठी राहा City News सोबत. धन्यवाद!