AmravatiHelth CareLatest News
पोटात गर्भ असलेल्या ‘त्या’ बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; १७ दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज!

अमरावती :- बुलढाणा जिल्ह्यातील दुर्मीळ वैद्यकीय घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. एका नवजात बाळाच्या पोटात गर्भ असल्याचा दुर्मीळ प्रकार आढळला होता. अमरावतीतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केवळ तीन दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याच्या पोटातील दोन मृत अर्भक बाहेर काढले. आता तब्बल १७ दिवसांच्या उपचारानंतर हे बाळ ठणठणीत असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या दुर्मीळ वैद्यकीय घटनेत डॉक्टरांच्या प्रयत्नांनी एका बाळाचे जीवन वाचवण्यात यश आले आहे. तीन वर्षे डॉक्टर बाळावर विशेष लक्ष ठेवणार असून त्याची नियमित सोनोग्राफी करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे वैद्यकीय जगतात एक ऐतिहासिक उदाहरण घालून दिले गेले आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा.