अ.भा. आंतर विद्यापीठ पॉवर लिÏफ्टग (पुरुष-महिला) व हॅन्डबॉल (महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाचे संघ घोषित

अमरावती :- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवर लिÏफ्टग (पुरुष व महिला) आणि हँडबॉल (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संघ घोषित करण्यात आले आहे.
पॉवर लिÏफ्टग संघ
युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर, हजरतबल, श्रीनगर येथे 17 ते 20 मार्च, 2025 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पॉवर लिÏफ्टग (पुरुष व महिला) स्पर्धेकरीता निवड झालेल्या पुरुष चमूचा प्रशिक्षण वर्ग सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे दि. 10 ते 14 मार्च, 2025 दरम्यान होणार आहे. चमूमध्ये बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळचा अजिंक्य शिंदे, कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हाचा अनुराग मौर्य, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा नबरुप सरकार व सौरभ शुभम, जी.एस. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांवचा यश जामोदे, स्व. कु. अर्चनाताई चव्हाण कला, वाणिज्य, श्री मनोहरराव नाईक महाविद्यालय, कोंडाळाचा कार्तिक गभणे व धनंजय गुडेवार, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा गिरिष डेंडुले, प्रो. राम मेघे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, अमरावतीचा अनुप भगत आणि श्री सुधाकरराव नाईक महाविद्यालय, अकोलाचा आनंदगोविंद सपकाळ.
महिला चमूंमध्ये श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोटची कु. माधुरी नाथे व कु. कल्याणी अस्वार, सिताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, अकोलाची कु. अ·िानी सोनवणे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. प्रियंका कुंडू व कु. साक्षी एस., नथमल गोयनका विधी महाविद्यालय, अकोलाची कु. अ·िानी शिंदे, कला व वाणिज्य महाविद्यालय, येवदाची कु. अंजली इंगळे, विज्ञान महाविद्यालय, मलकापूरची कु. अदिती तायडे व कला व वाणिज्य महाविद्यालय, कु-हाची कु. विशाखा बोदळे
हँडबॉल संघ
चौधरी बन्सीलाल विद्यापीठ, प्रेमनगर, भिवनी येथे 22 ते 25 मार्च, 2025 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ हँडबॉल स्पर्धेकरीता निवड झालेल्या महिला संघाचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे दि. 10 ते 19 मार्च दरम्यान होणार असून चमूंमध्ये सरस्वती महाविद्यालय, दहिहांडाची कु. शितल गावंडे, आदर्श महाविद्यालय, धामणगांव रेल्वेची कु. अर्पिता वाघमारे, कु. स्नेहल कोटनाके, कु. उज्ज्वला कोटनाके, कु. खुशी ठवरे, कु. कशिश कर्से, कु. राजनंदानी इंगोले, कु. सलोनी यादव, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. नंदिनी पेंद्राम, कु. अनिता चिमोटे व कु. रितिका कोहली, विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाची कु. कल्याणी सगुणवेढे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. साक्षी माटोडे, श्रीराम कला महिला महाविद्यालय, धामणगांव रेल्वेची कु. कशिश कर्से व कु. सलोनी यादव, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. देवयानी बोरकर, प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराची कु. साक्षी सुरजुसे व स्व. दादाराव शारीरिक शिक्षण महाविद्यालय, धामणगांव रेल्वेची कु. साक्षी राठोड यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.