ऑस्ट्रेलिया-इंग्लंडदरम्यान वाजवलं भारताचं राष्ट्रगीत

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लोहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ब्लंडर झालं. चक्क भारताचे राष्ट्रगीत पाकिस्तानमध्ये वाजले, त्यावेळी स्टेडिअममध्ये उपस्थित प्रेक्षक हैराण झाले आणि एकच खळबळ उडाली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहेत.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला चेंडू फेकण्याआधी राष्ट्रगीत होतं. पण त्याचवेळी पाकिस्तानकडून मोठी चूक झाली. स्टेडियमच्या भल्या मोठ्या स्पीकरवर ‘जन गण मन…’ वाजलं. त्यानंतर स्टेडियममध्ये एकाच खळबळ उडाली.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु होण्याआधी स्टेडियममध्ये एक मोठा ब्लंडर झाल्याचं पाहायला मिळालं. सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघाच्या राष्ट्रगीतासाठी मैदानात आल्या. त्यावेळी स्टेडियमवर भारताचं राष्ट्रगीत वाजवण्यात आलं. यावेळी मैदानात ‘जन-गण-मन’ वाजवण्यात आलं. त्यानंतर स्टेडियमवर मोठाच गोंधळ उडाला.
पाकिस्तान क्रिकेट मॅनेजमेंटकडून ही घोडचूक ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताआधी झाली. इंग्लंडचं राष्ट्रगीत व्यवस्थित वाजवण्यात आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी भारताचं राष्ट्रगीत वाजवण्यात आलं. त्यामुळे चूक समजताच भारताचं राष्ट्रगीत बंद करण्यात आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रगीत वाजवण्यात आलं.
पाकिस्तानकडून मोठी घोडचूक झाल्याचं बोललं जात आहे. टीम इंडियाची कोणताही सामना पाकिस्तानात होणार नाही. स्पर्धा सुरु होण्याआधी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी नकार दिला. त्यानंतर भारताने दुबईमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तानात भारताचा कोणताही सामना होणार नसताना भारताचं राष्ट्रगीत का वाजवण्यात आलं, याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या ब्लंडरनंतर सोशल मीडियावर भारतीयांकडून पीसीबीला ट्रोल केले जात आहे. पीसीबीच्या कार्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शुक्रवारी अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामनादरम्यान दोनदा मांजर आडवी आल्याने सामना थांबवण्यात आला होता.