ग्राम पंचायत दापोरी येथे 56 लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी पत्राचे वाटप !
मोर्शी :- मोर्शी तालुक्यातील दापोरी येथे ग्राम पंचायत स्तरावर दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ग्रामसभेचे आयोजन करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण टप्पा-२ मधील दापोरी येथील 56 लाभार्थ्यांना माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषाली विघे यांच्या हस्ते मंजुरी पत्र वितरीत करण्यात आले. १ जानेवारी २०२५ पासून राज्यात महाआवास सुरू करण्यात आले या अभियाना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान लाभार्थ्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून आपल्या हक्काचे घर मिळवावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषाली विघे यांनी घरकुल लाभार्थ्यांना केले.
जिल्हा परिषद शाळा दापोरी येथे दुपारी 1:30 वाजता सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थ, मंजूर लाभार्थी व त्यांचे कुटूंब आणि सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी गावातील उत्साही तरूण, सेवाभावी संस्था, बचत गट, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये एल.ई.डी.टि.व्ही. ची व्यवस्था करून दुपारी 4 वाजता बालेवाडी पुणे येथून झालेल्या मंजूर लाभार्थ्यांना मंजूरी पत्र देणे व निधी वितरण आदेशाचा कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री. भारत सरकार तसेच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे हस्ते संपन्न झाला असून त्या कार्यक्रमाचा लाईव्ह टेलीकास्ट दापोरी येथे जमलेल्या शेकडो नागरिकांना दाखविण्यात आला. शासनाच्या १० लाख लाभार्थी यांना आवास योजना मंजुरी पात्र, निधी वितरण कार्यक्रम ग्राम पंचायत स्तरावर माजी पहिला बाल कल्याण सभापती सौ वृषाली प्रकाश विघे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच संगीता ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, वर्षा फलके, सचिन उमाळे, सचिव विनोद राऊत, मुख्याध्यापक गजानन चौधरी, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार करत असून, राज्य शासनाने उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरात लवकर हप्ते वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी तीन लाभ मिळणार म. गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी योजनेतून ९० दिवसाच्या मजुरीचा लाभ देण्यात येणार असल्याचे मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आले यावेळी लाभार्थ्यांसह ग्रामस्थांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शवली .