थकीत कर्जदारांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा मोफत मार्गदर्शन मेळावा

बँक किंवा फायनान्स कंपनीचे कर्ज थकीत असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात लोकनेते बच्चू कडू आणि महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे ऍड. प्रसाद करंदीकर उपस्थित राहून कर्जदारांना कायदेशीर मदतीसह योग्य मार्गदर्शन करणार आहेत. कर्ज वसुली दरम्यान होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी आणि त्रस्त कर्जदारांना संघटित करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
कर्ज फेडण्याची जबाबदारी प्रत्येकाची असली तरी, अनेक वेळा अडचणींमुळे नागरिक थकबाकी भरू शकत नाहीत. मात्र, बँक आणि फायनान्स कंपन्या अरेरावीची वसुली पद्धत अवलंबून कर्जदारांना मानसिक तणावात टाकतात. याविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि त्रस्त कर्जदारांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी हा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी, जिल्ह्यातील जास्तीत जास्त थकीत कर्जदारांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज..