दाजीच्या डोक्यात सैतान घुसला, मित्रांना घेऊन मेहुणीवर बलात्कार केला; नंतर जे केलं ते कहरच..

उत्तर प्रदेश :- आधी २१ वर्षीय मेहुणीवर दाजीने बलात्कार केला. नंतर त्याच्याच दोन मित्रांनी लैंगिक अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली आणि मृतदेह जाळण्यात आला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, २ आरोपी अद्याप फरार आहे.
आमिष दाखवून सामूहिक बलात्कार
पोलिस अधीक्षक आदित्य बन्सल यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबाने २३ जानेवारी रोजी तिच्या बेपत्ता होण्याबाबत एफआयआर दाखल केला होता. तपासात आशिषचे मुलीशी अवैध संबंध होते ही बाब उघडकीस आली. तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता.
बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, आशिषने शुभम आणि दीपक यांच्यामदतीने मुलीला फसवले आणि नंतर तिला घराबाहेर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कारानंतर आरोपीने मुलीचा गळा दाबून हत्या केली.
हत्येनंतर मुलीचा मृतदेह जाळण्यात आला
पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आरोपीने मुलीचा मृतदेह जाळून टाकला. तपासाच्या आधारे, आशिषला अटक करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या शरीराचे जळालेले अवशेष सापडले आहेत आणि ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दोन फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.