बडनेरा नविवस्तीत भरदिवसा घरफोडी, आठ तोळे सोने आणि साडे पाच लाखांची चोरी

बडनेरा :- बडनेरा नववस्तीत एका धक्कादायक घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी आठ तोळे सोने आणि लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
बडनेरा नववस्ती परिसरातील अशोक नगर येथे भर रस्त्यावर असलेल्या एका बंद घरातून अज्ञात चोरट्याने आठ तोळे सोन्याचे दागिने आणि साडे पाच लाख रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून, शनिवारी सकाळी उघडकीस आली.
सेवानिवृत्त महानगरपालिका कर्मचारी भास्कर तिरपुडे यांच्या बंद घराचा कोंडा तोडून चोरट्याने कपाटातील रोकड आणि दागिने लंपास केले. विशेष म्हणजे तिरपुडे कुटुंबीय शेजारीच असलेल्या जनक रेसिडेन्सीमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, ज्या घरातून चोरी झाली ते बंद होते. चोरी झाल्यानंतर पोलिसांनी श्वानपथक घटनास्थळी आणले, मात्र श्वान घराच्या फाटकाबाहेरच थांबले.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, निर्जन घरात एवढी मोठी रक्कम आणि दागिने ठेवलेच कसे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, बडनेरा पोलिसांनी तपास सुरू केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आणि डीबी पथक पुढील तपास करत आहेत.
बडनेरा परिसरातील या घरफोडीने सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिस आता कोणत्या दिशेने तपास करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा city news