सुशिक्षित बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मेळावा – ४००० युवकांची नोंदणी

नांदेड :- सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भाजपाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकाराने नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ४००० हून अधिक युवकांनी नोंदणी केली असून, १५० पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांनी रोजगाराच्या संधी दिल्या. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या युवकांसाठी कंपन्यांनी थेट मुलाखती घेतल्या. काही युवकांना जागेवरच नोकरीची संधी मिळाली, त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यामध्ये आयटी, उत्पादन, आरोग्यसेवा, वित्तीय सेवा, सुरक्षा सेवा आणि अनेक क्षेत्रांतील कंपन्यांनी सहभाग घेतला.
युवकांना रोजगार मिळावा यासाठी हे आयोजन केल्याचे भाजपाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी सांगितले. या मेळाव्याला आलेल्या युवकांनीही आपल्या समाधानाची प्रतिक्रिया दिली.
रोजगार मिळावा म्हणून धडपडणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी हा रोजगार मेळावा नवा आशेचा किरण ठरला आहे. अनेक युवकांना थेट नोकरी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. अशाच उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
श्रीजया चव्हाण, आमदार भाजपा :- बाईट
“नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळावी, हा रोजगार मेळावा आयोजित करण्यामागचा उद्देश होता. हजारो युवकांनी सहभाग घेतल्याने मला आनंद होत आहे. भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील.