अमरावतीत सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था – स्वच्छता मोहिमेचा फज्जा!

अमरावती :- एकीकडे स्वच्छ भारत अभियान, दुसरीकडे अमरावती शहरातील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था! नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष! अमरावती महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे शहरातील अनेक भागातील शौचालयांची दुर्दशा झाली आहे! काय आहे ही दुर्दशा?
स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा फक्त कागदावर राहिल्या आहेत! अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये सार्वजनिक शौचालये अस्तित्वात नाहीत, आणि जिथे आहेत तिथे त्यांची परिस्थिती अक्षरशः भयंकर आहे! सिद्धार्थ नगर, भीमनगर आणि अनेक प्रभागातील सार्वजनिक शौचालये वापरण्यायोग्य राहिलीच नाहीत! हि शौचालय आहेत की नरक?शोचलयात नळ नाही – पाणी नाही! शौचालयाच्या शीट तुटलेल्या – घाण साचलेली!बाहेर कचऱ्याचे ढीग – दुर्गंधीचे साम्राज्य!
येथील रहिवाशांना अत्यंत खराब परिस्थितीत सार्वजनिक शौचालये वापरावी लागत आहेत!काही ठिकाणी दारच तुटलेले आहेत, त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे! नागरिकांनी मनपा स्वच्छता विभागाविरोधात संताप व्यक्त केला असून, यावर कोण कारवाई करणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे!संतापलेले स्थानीक रहिवासी म्हणतात,
“हे शौचालय आहे की नरक? पाणी नाही, दारं नाहीत, स्वच्छता नाही! आम्ही कुठे जावे? महापालिकेचे अधिकारी कधी पाहणी करणार?”महापालिकेने शहरात कोट्यवधींची शौचालये बांधल्याचे दाखवले, पण प्रत्यक्षात ती अस्तित्वात नाहीत किंवा वापरण्यायोग्य नाहीत!
निधी तर खर्च झाला, पण सुविधा काही मिळाल्या नाहीत!