आ.रवी राणा यांची दमदार कामगिरी सावरखेड ,ततारपुर या गावातील 343 कुटूंबाचे पुनर्वसन करण्यासाठी वलगावं येथील कृषी विभागाची जमीन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना आदेश,

अमरावती :- आ.रवी राणा हे सातत्याने निम्न पेढी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना लेखी पत्र देऊन त्या अनुषंगाने पाठपुरावा करत आले आहे.
त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी बैठकीत कृषी विभागाची जमीन जि वलगावं रोडवर आहे ती पुनर्वसन करण्यासाठी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमरावती व कृषी विभागात यांना देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की निम्न पेढी प्रकल्पांतर्गत मौजा सावरखेड_ ततारपुर या गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन त्यांच्या इच्छेनुसार त्या गावातील 343 कुटूंबाचे पुनर्वसन करायचे आहे भूखंड व नागरी सुविधा करिता साधारणता 25 हेक्टर आर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. प्रकल्पग्रस्तांची उपजीविका पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित शेती करण्याकरिता बुडीत गावठाण गावठाण जवळील लग्तची जागा मिळावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे केली असता, मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाची वलगाव जवळची जमीन वरील उपयोगसाठी देण्याचे आदेश दिले असून,जिल्हाधिकारी अमरावती व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती यांना संयुक्त कारवाई करावी असे निर्देश दिले आहे. येणे प्रमाणे पाठपुरावा करण्यासाठी आमदार रवी राणा यांनी आपले सचिव उमेश ढोणे त्यांना सूचना दिल्या आहेत. वरील मागणी संबंधाने सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ तसेच युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकार्यांनी आ.रवी राणा यांचे आभार मानले आहे.