धक्कादायक! रहाटगावमध्ये पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू – हत्या की आत्महत्या?

अमरावती :- अमरावतीतील रहाटगाव रिंगरोडवरील कल्पदीप मंगल कार्यालयासमोर एक धक्कादायक आणि रहस्यमय घटना समोर आली आहे! एका घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे! ही आत्महत्या आहे की त्यामागे एखादा गूढ कट आहे, याचा तपास पोलिस करत आहेत! पाहूया संपूर्ण रिपोर्ट!
रहाटगाव येथे पती-पत्नीने घरातच जीवन संपवल्याची माहिती मिळाली असून, यामागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतकांची नावे अमोल गायकवाड (वय 32) आणि शिल्पा गायकवाड (वय 30) अशी असून, दोघांचा सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता.
शेतात बांधलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर पती-पत्नी राहत होते, तर खाली मृतक अमोल यांचे आई-वडील राहत होते.
सकाळी ८ वाजेपर्यंत दोघेही खाली न आल्याने वडिलांनी वर पाहिले असता हृदय पिळवटून टाकणारे दृश्य समोर आले!
अमोल गळफास घेतलेल्या अवस्थेत होता, तर शिल्पा मृतावस्थेत बेडवर पडली होती. विशेष म्हणजे, शिल्पाच्या नाकातून रक्त वाहत होते, ज्यामुळे हा केवळ आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात, यावर संशय निर्माण झाला आहे. अमोलने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे, ज्यामध्ये तो म्हणतोय,मीच जबाबदार आहे, मीच गुन्हेगार आहे, मला माफ करा!
हे शब्द अधिक गूढ वाटत असून, यात नेमके कोणत्या गुन्ह्याची कबुली आहे, हे शोधणे आता पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे! शिल्पाच्या मृत्यूची कारणे अधिक संशयास्पद आहेत, कारण तिच्या शरीरावर काही जखमा आढळल्या आहेत! त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.आंतरजातीय विवाहामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते का? कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीचा यात सहभाग आहे का? अमोलने आधी पत्नीची हत्या केली आणि मग आत्महत्या केली का? या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत!
हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल! परंतु अशा घटना समाजाला मोठा धक्का देतात! आंतरजातीय विवाह, कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे! या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत असून, सत्य लवकरच समोर येईल!