नांदेडमध्ये भीषण अपघात! ट्रक आणि टिप्परच्या धडकेत चालक गंभीर जखमी

नांदेड :- नांदेडच्या अर्धापूर-तामसा रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे! ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि मुरुमाने भरलेल्या टिप्परमध्ये समोरासमोर धडक होऊन चालक केबिनमध्ये अडकला! जेसीबी आणि अग्निशामक दलाच्या मदतीने तब्बल तासभर शर्थीचे प्रयत्न करून चालकाला बाहेर काढण्यात आले! काय आहे हा अपघात?
आज सकाळी अर्धापूर-तामसा रस्त्यावर लोन शिवारात एक भीषण अपघात घडला! MH-18B-G-3227 या टिप्परने KA-56-4532 क्रमांकाच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली!
अपघात इतका भीषण होता की, टिप्पर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकला समोरून जोरदार धडक बसली! यात टिप्पर चालकाचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले आणि तो केबिनमध्ये अडकला.
अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर कदम आणि पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कराळे हे पोलिसांच्या फौजफट्यासह घटनास्थळी दाखल झाले!
दोन्ही जेसीबी कटर आणि अग्निशामक दलाच्या गाडीच्या मदतीने तब्बल एक तासाच्या प्रयत्नांनंतर टिप्पर चालकाला बाहेर काढण्यात यश आले!
या अपघातातील गंभीर जखमी चालकाला तातडीने नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षा आणि वाहन चालकांच्या सावधगिरीचा प्रश्न उपस्थित केला आहे! रस्त्यावर वेगमर्यादा आणि सुरक्षित अंतर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे! प्रशासन आणि वाहनचालक योग्य ती काळजी घेणार का? पाहूया पुढील अपडेट्स फक्त City News वर!