नागपुरात जबरी चोरी प्रकरणाचा छडा! शहर गुन्हे शाखेच्या युनिट-3 पथकाची मोठी कारवाई

नागपुर :- नागपुरात भररस्त्यात लूटमार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट-3 पथकाला मोठे यश आले आहे! लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाला मारहाण करून 3 लाखांची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे! पोलिसांनी 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणात दोन आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे!
नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानातील 3 लाख रुपये घेऊन दुचाकीवर घरी निघालेल्या इसमावर हल्ला करण्यात आला! आरोपींनी ट्रॅफिकमध्ये संधी साधत फिर्यादीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला आणि डोळ्यात मिरची पूड टाकली!
हा हल्ला एवढ्या वेगाने झाला की, इसमाला काही समजण्याच्या आतच दुसऱ्या आरोपीने 3 लाख रुपयांची रक्कम हिसकावली आणि आरोपी पसार झाले! मात्र, शहर गुन्हे शाखेच्या युनिट-3 पथकाने तात्काळ तपासाला सुरुवात करून आरोपींचा शोध घेतला.
तपासादरम्यान, पोलिसांनी दोघा आरोपींना आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. आरोपींकडून 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे!
भरदिवसा घडलेल्या या धक्कादायक लूटमारीमुळे नागपुरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते! मात्र, शहर गुन्हे शाखेच्या जलद कारवाईमुळे आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या! आता या प्रकरणातील आणखी कोणते धागेदोरे सापडतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!