भारत-पाकिस्तान सामना मोफत कुठे पाहायचा? प्लेइंग 11 काय? A टू Z माहिती एका क्लिकीवर!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचा धरार शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेत आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जग या सामन्याची वाट पाहात आहे. या सामन्यात नेमका कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेमका कुठे पाहता येणार? तसेच हा सामना नेमका कधी चालू होणार? हे जाणून घेऊ या…
यावेळच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हा पाचवा सामना आहे. याच सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी अडीच वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दुबाईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडीयम येथे हा सामना रंगणार आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय?
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान आघा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.
सामना नेमका कुठे पाहावा?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना तुम्हाला जिओ सिनेमावर अगदी मोफत पाहता येईल. सोबतच Disney+ Hotstar चे अॅप आणि संकेतस्थळ यावरही हा सामना तुम्हाला पाहता येईल. यासह हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि स्पोर्ट्स18 या चॅनेल्सवरही हा सामना लाईव्ह दाखवला जाईल. विशेष म्हणजे इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलुगु, कन्नड या भाषांतील समालोचनही तुम्हाला या चॅनेल्सवर पाहता येईल.