मलाबार गोल्ड अँड डायमंडस चे आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते उद्घाटन
अमरावती :- फेब्रुवारी-सोने हा एक मौल्यवान धातू असून त्याला सुवर्ण,स्वर्ण,कनक,हेम असेही म्हणतात. दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार.अर्थात,पुरुषांचे आणि मुलांचेही काही खास दागिने असतात.दागिने हे सर्वसाधारणतः विशेष दुर्मिळ ( आणि अर्थात किंमती)धातूंपासून केलेले असतात आणि त्यात बरेचदा विविध सुंदर हिरे बसवलेले असतात.अशातच अमरावतीत श्रीनिवासा कॉम्प्लेक्स, तळ व पहिला मजला,राजकमल चौका जवळ,बडनेरा रोड,अमरावती येथे रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वात मोठा आणि वैविध्यपूर्ण दागिन्यांचा संग्रह असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंडस या प्रतिष्ठान चा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला.याप्रसंगी आमदार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते या शोरूम चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमरावतीच्या नवनिर्वाचित आमदार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांचा मलाबार गोल्ड अँड डायमंडस प्रतिष्ठान च्या आशिष जोशी व सहकारी मान्यवरांचे वतीने आमदार – सौ.सुलभाताई खोडके यांचे यथोचित स्वागत व शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कर्णालंकार ते गळ्यातले दागिने,कर्णभूषण, पारंपारिक दागिने आदी सुवर्ण आभूषणे याची उपलब्धता असलेल्या दालनाला भेट देऊन पाहणी करीत असताना मलाबार गोल्ड अँड डायमंडस च्या संचालक मान्यवरांचे वतीने दिल्या जात असलेल्या पारदर्शकता-विनम्रता-विश्वसनीयता-विश्वासर्हता-तत्परता आदी सेवांची विस्तृतपणे माहिती देत आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांना अवगत करण्यात आले. लग्नाचा हंगाम म्हणजे दागिने खरेदीचा हंगाम.जर आपण वेगवेगळ्या सोन्याच्या दागिन्यांबद्दल बोललो तर त्याला नेहमीच मागणी असते. लग्नाच्या मोसमाच्या निमित्ताने, विशेषतः वधूसाठी एक संग्रह आहे.ज्यामध्ये एक अतिशय सुंदर सोन्याचा हार,नथ,झुमके,मांग टीका सर्व काही आहे.येथील सुवर्ण अलंकार खूप सुंदर आहेत. त्याची रचना आणि नमुना अगदी अद्वितीय आहे.आजकालच्या नवीन पिढीला आवडतील.असे लेटेस्ट डिझाईन आणि त्याचा वेगळा पॅटर्न खूपच सुंदर आहे. पारंपरिक पद्धतीचे शाही सोन्याच्या दागिन्यांची मालिका उपलब्ध झाल्याने अमरावतीत आता मलाबार गोल्ड अँड डायमंडस या प्रतिष्ठान मुळे ग्राहकांना अग्र पसंतीचे स्वर्ण आभूषणे खरेदीसाठी ही एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. या शब्दांत आमदार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी प्रतिष्ठानच्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या.संपूर्ण पारदर्शकता, आजीवन देखभालीची हमी,१००% मूल्य सोन्याच्या एक्सचेंजवर,१००%मूल्य डायमंड एक्सचेंजवर,तपासलेले आणि प्रमाणित हिरे,परत घेण्याची हमी,कोंप्लिमेंटरी विमा,१००% huid हॉलमार्क सोने,अधिकृतपणे स्रोत केलेली उत्पादन,न्याय कामगार पद्धती,रास्त किंमत धोरण आदी विशेषतः असलेल्या तसेच १३ देशांमध्ये ३७५ पेक्षा जास्त शोरूम्स असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंडसच्या अमरावती येथील शोरूम मध्ये यावेळी स्वर्ण-आभूषणे खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.