मोर्शीत गोवंश तस्करीचा थरार! बजरंग दल आणि वारसा संस्थेच्या धडक कारवाईत गायींना जीवदान!

मोर्शी :- मोर्शी तालुक्यात गोवंश तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे! बजरंग दल आणि वारसा संस्थेच्या सतर्कतेमुळे एका AC वाहनातून गायींची तस्करी पकडण्यात आली! आश्चर्याची बाब म्हणजे, वाहनाचा टायर फुटल्यानंतरही आरोपींनी तब्बल 10 किलोमीटर गाडी फरफटत नेली! काय आहे ही धक्कादायक घटना?
मोर्शी तालुक्यातील माळवाडी फाट्यावर एक मोठी कारवाई करण्यात आली आहे! AC वाहनामध्ये दुधाच्या टँकरच्या आड गोवंश तस्करीचा प्रयत्न सुरू होता. मात्र, बजरंग दल आणि वारसा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी अडवून मोठा गौहत्या कट उधळून लावला!
गुप्त माहितीच्या आधारे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, टायर फुटूनही आरोपींनी गाडीचा वेग कमी केला नाही आणि तब्बल 10 किलोमीटर वाहन फरफटत नेले! अखेर, माळवाडी फाट्यावर वाहन अडवल्यानंतर ही गोवंश तस्करी उघडकीस आली!
या AC वाहनामध्ये अत्यंत निर्दयीपणे 7 गायी आणि 2 बैल कोंबून वाहतूक केली जात होती. सकाळी 6 वाजता झालेल्या या कारवाईत कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून या निरपराध प्राण्यांचे प्राण वाचवले!
या घटनेनंतर पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून या तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा छडा लावण्यासाठी तपास सुरू आहे! या तस्करीच्या मागे कोणता मोठा मास्टरमाइंड आहे? या गायी कुठे आणि कशासाठी नेत होत्या? हे सर्व प्रश्न आता तपासाअंतर्गत आहेत!
गोवंश तस्करीच्या या प्रकारावर आता प्रशासन काय कारवाई करणार? तस्करीचा हा धक्कादायक प्रकार पाहता, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे! या प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहे? हे उघड होणार का? पुढील अपडेटसाठी पाहत राहा City News !