वडनेरगंगाई येथे भव्य रोगनिदान शिबिर कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य

दर्यापूर :- दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे भाजपचे जिल्हा सचिव विशाल माहुलकर यांच्या पुढाकारातून कर्मयोगी संत गाडगेबाबा विचार मंचातर्फे बाबांच्या जयंतीनिमित्त भव्य रोगनिदान शिबिर घेण्यात आले. दरम्यान शेकडो रुग्णांची रुग्ण तपासणी करण्यात आली.
कर्मयोगी संत गाडगेबाबा विचार मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या रोगनिदान शिबिराला बालरोग तज्ञ डॉ.निशांत अनिल गावंडे, दंत शल्य चिकित्सक डॉ.प्रसन्न पुंडकर, स्त्रीरोग तज्ञ श्वेता ऋषिकेश येऊल, वात्सल्य पॉली क्लिनिकचे संचालक डॉ.भैय्यासाहेब गावंडे, डॉ. अनिल गाडखे, डॉ. रिजवान यांनी उपस्थित राहून रुग्ण सेवा केली. दरम्यान विविध रुग्णांची विविध आजारांची तपासणी, रोग निदान आणि मार्गदर्शक इत्यादी बाबींवर शिबिरात भर देण्यात आला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपचे जिल्हा सचिव विशाल माहुलकर, सागर माहुलकर, आकाश माहुलकर, दीपक माहुलकर, विशाल माहुलकर, निलेश देशमुख, राजू आकोटकर, दिलू मावळे, योगेश मोकळकर, प्रणव कंटाळे, आकाश कंटाळे, उमेश माहुलकर, आकाश श्रीकृष्ण माहुलकर, कुलदीप हागे, नंदूभाऊ निकोले, ऋषिकेश इंगळे, पुंडलिक माहुलकर, किरण माहुलकर, दिनकर देशमुख, संजय माहुलकर, गोपाल माहुलकर, भैय्यासाहेब गावंडे, प्रवीण माहुलकर, श्रीकृष्ण माहुलकर, नंदू माहुलकर, सागर माहुलकर, शुभम माहुलकर, प्रज्वल माहुलकर , संस्कार माहुलकर, आयुष माहुलकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.