श्रीक्षेत्र नागरवाडी येथे संत गाडगेबाबांचा १४९ वा जयंती महोत्सव उत्साहात साजरा

“स्वच्छतेचे आद्यजनक, समाजसुधारक संत गाडगेबाबांची १४९ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात श्रीक्षेत्र नागरवाडी येथे साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चला पाहूया या भक्तिमय सोहळ्याचा खास रिपोर्ट!”
“नागरवाडी इंद्रभुवन नगरीत हरिनामाच्या गजरात, भक्तिरसात न्हालेल्या संत गाडगेबाबांच्या जयंती महोत्सवाला हजारो भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महोत्सवाच्या निमित्ताने सप्ताहभर भजन, कीर्तन, प्रवचन, अन्नदान, वस्त्रदान आणि स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले. समारोपीय सोहळ्यात संत गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन श्री. मधुसूदन मोहिते पाटील यांच्या हस्ते महाआरती व मूर्ती पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे, या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविकांनी ‘गोपाला गोपाल’ च्या गजरात हरिनामाचा जल्लोष अनुभवला.”
“संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर घडवणाऱ्या या जयंती महोत्सवाने नागरवाडी नगरीत भक्तिरसाची उधळण केली. त्यांच्या सेवाभावी कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरला.