दिव्यांगांसाठी विद्यापीठात ट्रायसिकलची सुविधा उपलब्धकुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते लोकार्पण

दिव्यांग विद्याथ्र्यांना विद्यापीठात कामानिमित्त आल्यानंतर कोणतीही गैरसोय होऊ नये या दृष्टिकोणातून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने दिव्यांग विद्याथ्र्यांकरिता आधुनिक अशा बॅटरीवर चालणा-या ट्रायसिकलची सुविधा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाला उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते नुकतेच या ट्रायसिकलचे लोकार्पण करण्यात आले.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पाचही जिल्ह्रांमधील विद्यार्थी आपल्या कामासाठी विद्यापीठात येतात. त्यातच दिव्यांग विद्याथ्र्यांना मोठ¬ा अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे विद्यापीठाचे तत्कालीन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई यांनी दिव्यांग विद्याथ्र्यांकरिता ट्रायसिकलची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता व तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी त्यादृष्टीने पावले उचलली व ट्रायसिकलची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. नुकतेच ट्रायसिकलचे कुलगुरूंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, रा.से.यो. संचालक डॉ. निलेश कडू आदी उपस्थित होते.