Amaravti GraminLatest News
नावेड वाळूडेपोतील २ हजार ९२ ब्रास वाळूचा लिलाव २८ फेब्रुवारीला

"भातकुली तालुक्यातील नावेड वाळूडेपोतील मुदत संपल्याने उरलेला वाळूसाठा प्रशासनाने जप्त केला आहे. आता या वाळूसाठ्याचा लिलाव होणार असून, इच्छुकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
"तर २८ फेब्रुवारीला होणाऱ्या या लिलावासाठी इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी वेळेत सहभागी व्हावे. प्रशासनाच्या नियमांनुसार पारदर्शक पद्धतीने हा लिलाव पार पडेल. अधिक माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा. अपडेट्ससाठी पाहत राहा Siti News!"
"भातकुली तालुक्यातील मौजा नावेड वाळूडेपोची मुदत संपल्यानंतर, डेपोमध्ये २ हजार ९२ ब्रास वाळू शिल्लक राहिली होती. प्रशासनाने हा साठा जप्त करून, त्याच्या लिलावासाठी तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हा लिलाव शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता तिवसा-भातकुली उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात पार पडणार आहे.
सदर लिलावात कोणत्याही इच्छुक व्यक्ती, संस्था आणि शासकीय विभाग सहभाग घेऊ शकतात. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीरनामा काढला आहे. पारदर्शक पद्धतीने हा लिलाव पार पडेल, अशी प्रशासनाची हमी आहे. तर इच्छुकांनी वेळेत अर्ज करून या लिलावात सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी तिवसा-भातकुली उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा."