AmravatiLatest News
पाच अनाथ मुलींच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
अमरावती, दि. 25 (जिमाका) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने पाच मुलींच्या माहितीसाठी निवेदन प्रसिद्ध केले आहे. या मुली अनाथ असून त्यांना त्यांच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी, तसेच पालकांनी बाल कल्याण समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
लक्ष्मी जनकरामसिंग धुर्वे (वय 16 वर्षे) ही वरुड बसस्थानकावर बेवारस स्थितीत आढळली आहे. सिता प्यारासिंग पवार (वय 14 वर्षे) ही रेल्वेमध्ये भीक मागताना पोलिसांना आढळली आहे. सीमा हिरालाल मावसकर (वय 14 वर्षे) ही वडाळा रेल्वे स्टेशनवर तिच्या सावत्र वडिलांच्या सक्तीमुळे भीक मागताना आढळली आहे. दीक्षा योगेश इंगळे (वय 14 वर्षे) ही कुटुंबातील शारीरिक छळामुळे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राणी बुधिया पवार (वय 11 वर्षे ही जालना येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाली. त्यानंतर तिला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे.
या पाच मुली सध्या अमरावतीमधील वेगवेगळ्या बालगृहांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या आई-वडिलांविषयी किंवा नातेवाईकांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या मुलींविषयी माहिती असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, राणी दुर्गावती चौक, कॅम्प रोड, अमरावती, दूरध्वनी क्रमांक 0721-2990412, ईमेल: dcpu.amravati@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.