Latest NewsMaharashtra
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला अटक; 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला अटक करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला मारहाणप्रकरणी गजा मारणेला अटक करण्यात आली आहे. शिवजयंती मिरवणुकीदरम्यान गजा मारणेनं इंजिनियरला मारहाण केली होती. त्याच्यावर मकोका नुसार कारवाई करण्यात आली आहे. तर मारहाण झालेला तक्रारदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता आहे.
कुख्यात गुंड गजा मारणेला सोडणार नाही असा दम पोलीस आयुक्तांनी भरला होता. यानंतर गजा मारणे स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला. पुण्यातील देवेंद्र जोग या आयटी इंजिनियरला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना शिवजयंतीच्या दिवशी घडली होती. याप्रकरणी यााधी तिघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल असलेले आरोपी मारणे टोळीशी संबंधित असल्याचे उघडकीस आले.
ज्याला मारहाण झाली तो तरुण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता आहे. या घटनेनंतर मोहोळ यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुणे पोलीस ऍक्शन मोड वर आले आणि त्यांनी या घटनेतील आरोपींवर मकोका लावला. इतकच नाही तर आरोपींच्या टोळीचा म्होरक्या गजा मारणे यालादेखील आरोपी बनवलं. गजा मारणे स्वत: पोलिसांसमोर हजर झाला.
शिवजयंतीच्या मिरवणुकी दिवशी मारहाणीची घटना घडली होती. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला देवेंद्र पुरुषोत्तम जोग स्वतःच्या दुचाकीवरून घरी जात होता. मिरवणूक सुरू असताना मिरवणुकीच्या मध्ये गाडी घातली म्हणून मिरवणूक काढणाऱ्या तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली होती.
जेलमधुन सुटल्यावर गजा मारणे याची मिरवणुक
अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा तळोजा जेलमध्ये होता. मात्र पुराव्यांआभावी त्याची मुक्तता झाली. त्याच्या स्वागताला तळोजा जेलबाहेर त्याचे समर्थक गावगुंड पोहोचले. थोडेथोडके नव्हे ! तब्बल 300 कारचा ताफा घेऊन नवी मुंबई ते पुणे अशी गजा मारणे याची मिरवणुक काढण्यात आली होती.