AmravatiLatest News
मनपा उच्च प्राथमिक शाळा महादेव खोरीच्या विद्यार्थ्यांची दिशा नेत्रालय व इंटरनॅशनल आय बँक तर्फे मोफत नेत्र तपासणी

महादेव खोरी परिसरातील मनपा उच्च प्राथमिक शाळा महादेव खोरी येथे दिनांक 20 फेब्रुवारी 2025ला दिशा नेत्रालय व इंटरनॅशनल आय बँक तर्फे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली ६०विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणी करून घेतली डॉक्टर प्रणाली चांभारे अनिल देशमुख टेक्निशियन तथा भारत भाऊ या टीमने विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली बऱ्याच विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आढळून आला विद्यार्थ्यांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करावा तसेच पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांप्रती जागृत असणे गरजेचे आहे असे मत डॉक्टर प्रणाली चांभारे यांनी व्यक्त केले महानगरपालिकेचे सन्माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना मोफत नेत्र तपासणीचा लाभ मिळाल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती बनसोड मॅडम यांनी दिशा नेत्रालय व इंटरनॅशनल बँक यांचे आभार मानले या उपक्रमाच्यायशस्वी ते करिता कुमारी प्रज्ञा ढंगारे चित्रलेखा ननावरे निशा चव्हाण मनीषा बदुकले सचिन सराड महेंद्र खडसे मोनाली चंचल तथा घोरमाडे बाई यांनी सहकार्य केले