तिवसामध्ये एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास!

तिवसा :- तिवसामध्ये मध्यरात्री मोठी घटना घडली आहे. बस स्टॉपजवळील स्टेट बँकेच्या एटीएम मशीनवर अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून लाखोंची रोकड लंपास केली आहे. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर चोरट्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी संपूर्ण मशीन जाळून टाकली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.
तिवसामधील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी घडली. अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून लाखोंची रोकड लंपास केली आणि नंतर कोणतेही पुरावे राहू नयेत म्हणून संपूर्ण मशीन जाळून टाकली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून फुटेज खराब करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असून, पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. बँक प्रशासनाने घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवली आणि आता परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.या चोरीमुळे तिवसा शहरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी हा गुन्हा गांभीर्याने घेत तातडीने तपास सुरू केला आहे.
आता बँकेतील एटीएमही सुरक्षित राहिलेले नाहीत. तिवसामध्ये घडलेल्या या घटनेने नागरिकांना हादरवून सोडले आहे.पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला असला तरी चोरट्यांपर्यंत ते पोहोचतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.