LIVE STREAM

Crime NewsLatest News

नवरा गेला अन् प्रियकरही; पतीला तलावात फेकताना बॉयफ्रेण्डही पडला, अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट

सोलापूर :- पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाला वाचा फुटली आहे. पांगरी पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला. पोलिसांनी विवाहित प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. नवरा गेला, प्रियकरही गेला आणि स्वतःला बिन भाड्याच्या खोलीत सरकारी पाहुणचार घेण्यासाठी जेलची हवा खाणं प्रेयसीच्या नशिबी आलं. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव तलावातील दोघांच्या मृत्यू प्रकरणातील सत्यता पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. प्रेयसीच्या पतीला उचलून तलावात फेकताना त्याने त्याचा गळा धरला आणि प्रियकरही पाण्यात बुडून मरण पावल्याची कबुली साक्षीदाराने पोलिसांना दिली आहे.

याप्रकरणी पांगरी पोलिसांनी मयत गणेश अनिल सपाटे वय २६, रा. अलीपूर रोड, बार्शी आणि रूपाली शंकर पटाडे वय ३५ या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिलेला अटक केली आहे. महागाव ता. बार्शी येथील ढाळे पिपळगाव तलावात पुलावरून पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली होती. त्या दोघांचा मृत्यू संशयास्पद होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सत्यता समोर आणली आहे.

रुपालीच्या सुखी संसारात अनैतिक संबंधास सुरुवात

रुपाली वय ३५ आणि शंकर पटाडे वय ४० हे दोघे नवरा-बायको होते. दोघांचा प्रेम विवाह झाला होता. बार्शी शहरातील यशवंत नगर येथे हे दोघे वास्तव्यास होते. या दोघांच्या संसाराच्या वेलीवर दोन फुलं उमलेली. शंकर हा वाहन चालक होता. तर रुपाली ही घरकाम करत होती. सगळं काही चांगलं चालंलं होतं. याच टप्प्यावर बार्शीमधील अलीपूर रस्ता परिसरातील २६ वर्षाचा गणेश अनिल सपाटे हा रुपालीच्या आयुष्यात आला होता. त्याचं आपल्या पत्नीच्या आयुष्यात येणं हे शंकर पटाडे यांना न आवडलेला. नवरा शंकर यांने रुपाली आणि गणेश यांच्या प्रेमाला खूप विरोध केलेला. पती-पत्नीत सतत भांडणं होत होती. प्रियकर गणेशला सोडून दे, असं शंकर वारंवार सांगत होता.

प्रेमात अडथळा नको; त्यामुळे प्लॅन आखला

रुपाली आणि गणेश यांचं प्रेम अधिकच फुलत गेले होतं. पती शंकर याचे प्रेम प्रकरणात अडथळा करणं है रुपाली आणि गणेश यांना नेहमी खटकत होतं. त्यातून वा दोघांनी शंकरचा कायमचा काटा काढण्याचं ठरविलेला होता. यासाठी रुपाली आणि गणेश दोघांनी प्लॅन आखला होता. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रियकर गणेश यांने शंकर पटाडे याचा कायमचा काटा काढण्यासाठी त्याला याच तालुक्यातील बावी शिवारातील एका हॉटेलमध्ये दारू पार्टीसाठी घेऊन गेला होता. गणेश यांनी सोबतीला आपले दोघे मित्रपण मदतीला घेतलेले होते.

नवरा आणि प्रियकर दोघांचा शेवट झाला

शंकरचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करण्याचं ठरवून सर्वांनी दारू ढोसली होती. मयत शंकर देखील फुल्ल प्यायला होता. गणेश सपाटे हा आपल्या मित्रासह शंकर याला सोबत येऊन महागाव ता. बार्शी येथील तळ्यावर गेला. मध्यरात्रीच्या सुमारास त्याने पुलावर थांबून शंकरला तलावातील पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, तलावात पडताना शंकर पटाडे वाने गणेशला मिठी मारली. त्यामुळे दोघेही तलावातील पाण्यात पडले. दोघांनाही बाहेर येणं अशक्य झालं. नवरा शंकर आणि प्रियकर गणेश दोयांचाही शेवट तलावात झाला होता.

पांगरी पोलिसांनी छडा लावला

बार्शी तालुक्यातील पांगरी पोलिसांनी या दुहेरी खुनाचा छडा लावला आहे. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पडला प्रकार एकाने पाहिला होता. याची माहिती संबंधितानं पांगरी पोलिसांना कळवली. त्याप्रमाणे पोलिसांनी तपास केला असता खुनाला वाचा फुटली. त्यानंतर पांगरी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल श्रीहरी योडके यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली.

रुपाली आणि शंकर यांना दोन मुलं आहेत. रुपाली हिच्या स्वैराचार वागण्यातून सोन्याचा संसार उध्वस्त झाला. या मुलांचा पिता कायमचा गेला. पित्याचा मोठा आधार गेला, तर आता वडिलांच्या खुनाच्या प्रकरणात आई तुरुंगात आहे. आईचा पण आधार गेल्याने दोन मुलं पोरकी झाल्याने बार्शीत हळहळ व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!