नागपूर शहर गुन्हे शाखेने लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यापाऱ्याची लूट करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले

नागपूर :- नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने एक मोठा यश मिळवला आहे. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीतील व्यापाऱ्याची लूटमार करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. ताज्या माहितीनुसार, दोन आरोपींनी व्यापाऱ्याच्या जवळ 3 लाख रुपयांची रक्कम हिसकावली आणि पसार झाले होते. मात्र पोलिसांच्या त्वरित कार्यवाहीमुळे त्यांना पकडले गेले.
नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने यशस्वी ऑपरेशन राबवले आणि दोघा आरोपींचा तात्काळ शोध घेण्यात यश मिळवले. फिर्यादी दर्शन इरानी हे दुकान बंद करून दुचाकीवरून त्यांच्या निवासस्थानी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि अडवून मारहाण केली. आरोपींनी 3 लाख रुपयांची रक्कम लंपास केली आणि घटनास्थळावरून पसार झाले.पोलिसांच्या पथकाने तत्काळ शोध घेत आरोपींचा शोध लावला आणि सोनू उर्फ फारुख शेख व संतोष बाबाराव चव्हाण यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 2 लाख 7 हजार रुपयांची रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
सदर प्रकरणाची अधिक तपास लकडगंज पोलीस स्टेशनच्या हवाली करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी घटनेची माहिती सिटी न्यूज कडे दिली आहे. हि घटना पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे सुलभ झाली असून, आरोपींचा अटक केल्याने लुटमार करणाऱ्यांना धडा शिकवला आहे.