पाच अनाथ मुलींच्या पालकांनी संपर्क साधावा – महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

अमरावती :- अमरावती जिल्ह्यात पाच अनाथ मुली सध्या वेगवेगळ्या बालगृहांमध्ये राहत आहेत. त्यांच्या पालकांचा किंवा नातेवाईकांचा शोध सुरू असून जिल्हा महिला व बाल विकास विभागाने विशेष आवाहन केले आहे.
ही पाच मुली वेगवेगळ्या ठिकाणी बेवारस स्थितीत सापडल्या. लक्ष्मी धुर्वे ही वरुड बसस्थानकावर, सिता पवार रेल्वेत भीक मागताना, तर सीमा मावसकर वडाळा स्टेशनवर सावत्र वडिलांच्या सक्तीमुळे भीक मागताना आढळली. दीक्षा इंगळे हिने कुटुंबातील छळाविरोधात तक्रार केली, तर राणी पवार जालना जिल्हा रुग्णालयात सापडली. सध्या त्या अमरावतीतील बालगृहांमध्ये आहेत आणि त्यांच्या पालकांचा शोध घेतला जात आहे. जिल्हा महिला व बाल विकास विभागाने जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.
या मुलींच्या पालकांविषयी किंवा नातेवाईकांविषयी माहिती असल्यास त्वरित जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, अमरावती येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. या निराधार मुलींना त्यांच्या कुटुंबाशी जोडण्यासाठी तुमच्या एका मदतीची गरज आहे.