पालकमंत्री यांचे शुभहस्ते जी.प.कर्मचारीद्वारा सुरू केलेल्या पाणपोई चे उद्घघाटन आमदारांची ही होती उपस्थिती.

अमरावती :- सन २०१२ पासून सुरू आहे.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांचे विद्यमाने पाणपोई . या पाणपोई चे उदघाटन पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते ते आढावा बैठक घेण्यासाठी आले असता त्या वेळी झाले. यावेळी आमदार रवी राणा, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, प्रताप अडसड आदी आमदार यावेळी उपस्थित होते.जिल्हा परिषद मध्ये येणाऱ्या नागरिकांन करीता पाणपोई लावून थंड पाण्याची उपलब्ध करुन देण्यांत येते करीता हया वर्षी सुद्धा मा मुख्य कार्यकारी अधिकारी मा संजीता महापात्र व मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री बालासाहेब बायस यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद आवारात पाणपोई सुरु करण्यांत आली आहे .
जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्री. पंकज गुल्हाने यांचे सह सघटनेचे पदाधिकारी श्री. विजय कविटकर, श्री. निलेश तालन, श्री. श्रीकांत मेश्राम, श्री. जिवन नारे, विशाल विघे, श्रीकांत सदाफळे, परमेश्वर राठोड, तिनीत माहोरे , आमदार रवी राणा यांचे युवा स्वाभिमान चे सचिव उमेश ढोणे, जी.प. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पालकमंत्री यांनी पाणपोई चे उद्घघाटन करतेवेळी या उपक्रमाचे कौतुक केले. कर्मचारी संघटनेने पालकमंत्री यांचे स्वागत केले.