LIVE STREAM

Amaravti GraminCrime NewsLatest Newsmelghat

भयंकर! घरगुती उपाय म्हणत 22 दिवसांच्या बाळाच्या पोटावर विळा गरम करत अक्षरश: 65 वेळा चटके, मेळघाटातून धक्कादायक प्रकार समोर

अमरावती ,मेळघाट :- अवघ्या 22 दिवसांचं बाळ आजारी पडल्याने घरगुती उपाय म्हणून नातेवाईकांनी विळा तापवून अक्षरशः 65 वेळा बाळाच्या पोटावर डागण्या दिल्याची धक्कादायक घटना घडलीय .मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सिमोरी गावातून हा संतापजनक प्रकार समोर आलाय . या प्रकारामुळे बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरीवरून हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले .त्यानंतर तिथून अचलपूरला नेले . आता अखेर अमरावतीमध्ये डफरीन रुग्णालयात बाळाला उपचारासाठी दाखल करण्यात आले .

घरगुती उपाय म्हणून बाळाला 65 वेळा चटके!

सिमोरी गावातील रहिवाशी बेबी उर्फ फुलवंती राजू अधिकार यांना 22 दिवसांचे बाळ आहे .बाळ आजारी पडल्याचं कळताच घरगुती उपाय म्हणून नातेवाईकांनी बाळाच्या पोटावर विळा गरम करून अक्षरशः 65 वेळा चटके दिले .त्यामुळे बाळाचे प्रकृती बिघडली .त्यामुळे घाबरून जाऊन बाळाला सिमोरीवरून हतरूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं गेलं .त्यानंतर बाळाला हतरू येथून अचलपूरला आणि नंतर अमरावती येथील डफरीन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे .या घटनेची माहिती उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली असून बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय . या घटनेमुळे बालमृत्यू, कुपोषणासोबतच मेळघाटातील घरगुती उपायाने किती जीवघेणे प्रकार घडू शकतात हे समोर आले आहे.

बाळाला श्वास घेण्यास त्रास, अमरावतीत उपचार सुरु

मेलघाटमधील त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला अमरावतीला आणण्यात आल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णालय येथील डॉक्टरांनी दिली.बाळ हा 21 दिवसाचा आहे.. त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे त्यामुळे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात फॅसिलिटी नसल्याने त्याला नागपूरला रेफर केले जाऊ शकते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्या कुटुंब सदस्यांनी पोटाला चटके दिले असतील पण चटके गंभीर नसून श्वास घेता येत नाही ती मूळ समस्या आहे. असेही त्यांनी सांगितले.

मेळघाटात आरोग्य यंत्रणेवर कोट्यवधींचा खर्च होतो पण कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यात हा विभाग सातत्याने अपयशी ठरलाय . कधी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने होणाऱ्या गर्भवती स्त्रियांचे मृत्यू ,अज्ञान आणि अंधश्रद्धेतून होणारे घरगुती उपायही जीव घेणे ठरत असल्याचं समोर येत आहे .शासकीय आकडेवारीनुसार मार्च 2020 ते सप्टेंबर 2024 पर्यंत मेळघाटात 818 बालमृत्यू आणि 24 मातामृत्यू झाले आहेत .मेळघाटाच्या अतिदुर्गम भागातील सिमोरी गावात घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा या साऱ्या प्रकारावर लक्ष वेधले गेले आहे .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!