लकडगंज पोलिसांनी गंगा जमुना परिसरातील 9 लांविरोधात धडक कारवाई केली

नागपूर :- लकडगंज पोलिसांनी गंगा जमुना परिसरातील महिलांविरोधात धडक कारवाई केली आहे. रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा जमुना परिसरात असभ्य वर्तन करणाऱ्या महिलांविरोधात कारवाई करत 9 महिलांना अटक केली आहे. या महिलांनी रस्त्याच्या कडेला हातवारे करून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार होती.
रविवार, 24 फेब्रुवारीला 3 महिलांवर आणि 25 फेब्रुवारीला 6 महिलांवर कारवाई करण्यात आली. लकडगंज पोलिस आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान हे महिलांना ताब्यात घेतले. या महिलांविरोधात पिटा कायदा, म्हणजेच कलम 7 आणि 8 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केले आणि नागरिकांना आकर्षित करण्यासाठी हातवारे केले, त्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
लकडगंज पोलिस निरीक्षक चांदेवार यांनी घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाईसाठी पोलिसांची नजर ठेवीत राहील. हे पथक अधिक तपास करत आहे आणि पुढील कारवाई केली जाईल.