विधानसभेच्या आश्वासन समितीच्या अध्यक्षपदी आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संमतीने नियुक्ती

मुंबई :- विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या संमतीने सतत चौथ्यांदा विधानसभा सदस्य म्हणून विजयी झालेले आमदार रवी राणा यांची नियुक्ती महाराष्ट्र विधानसभा, विधीमंडळाच्या आश्वासन समितीच्या अध्यक्ष पदी झाली. ते ह्या समितीच्या माध्यमातून राज्यातील जनतेला न्याय मिळवून देतील. या समितीच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाविषयी सभागृहात मंत्री , राज्यमंत्री, राज्यातील मंत्रालयीन मुख्य सचिव, अमूस, प्रधान सचिव, सचिव, व क्लास वन, ते कनिष्ठ अधिकाऱ्याचे समन्वयातून मंत्री आश्वासन देत असतात,दिले जाते त्याची पूर्तता, अंमलबजावणी करणे या समितीचे अधिकार व कार्य, आहे.
या संबंधाने मंत्रालयीन अप्पर मुख्य सचिव , सचिव व अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी या समितीचे अध्यक्ष त्यांना बोलावत असतात त्यांची साक्ष घेण्यासाठी त्यांना उपस्थित ठेवतात या समन्वयाने आश्वासन पूर्ती होत असते.अश्या पद्धतीने अध्यक्ष आश्वासन त्याची अंमलबजावणी व पूर्तता करत असतात.राज्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्याचे अधिकार अध्यक्ष यांना असतात समितीचे अधिकारातून ते कार्य करत असतात. या अनुषंगाने आमदार रवी राणा आता पूर्ण राज्यावर या समितीच्या माध्यमातून राज्यातील अधिकाऱ्यांवर सनदी अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार आहे. राज्याला पुढे नेण्यासाठी निर्णयाची अंमलबजावणी करणार व जनतेची जास्त जोमाने सेवा करणार अशी राज्यात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.