सालबर्डी महाशिवरात्री यात्रा विशेष – सिटी न्यूज अमरावती

सालबर्डी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या सालबर्डी येथे भव्य यात्रा पार पडली. हजारो वर्षांपासून गूढरम्य अशा गुफेमध्ये असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली.
महाशिवरात्रीचा पवित्र दिवस, भक्तांच्या जयघोषाने सालबर्डी दुमदुमले. नदी-पहाडांच्या कुशीत विसावलेल्या या शिवलिंगाचे विशेष पूजन करण्यात आले. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त येथे आले. डफलीच्या तालावर गायीले जाणारे पारंपरिक गीते आणि भोलेनाथाच्या जयघोषाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यात्रेच्या निमित्ताने स्थानिक चविष्ट पदार्थांचा आनंद भाविकांनी लुटला. सालबर्डीचा प्रसिद्ध बोरकुट आणि रेवड्या यात्रेचे खास आकर्षण ठरले. भाविकांनी या यात्रेच्या व्यवस्थेबाबत आणि त्यांच्या अनुभूतीबद्दल सिटी न्यूज अमरावतीच्या टीमला प्रतिक्रिया दिल्या.
महादेवाच्या भक्तांसाठी सालबर्डी ही केवळ यात्रा नसून एक आध्यात्मिक पर्वणी आहे. लाखो भाविकांनी येथे हजेरी लावून महादेवाचे दर्शन घेतले. पोलिस बंदोबस्तासह सुरळीत पार पडलेल्या या यात्रेचा अनुभव सिटी न्यूज अमरावती ने आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो. अशाच विशेष रिपोर्ट्स आणि स्थानिक घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज अमरावती.