सुपर स्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलच्या सेवा, सुविधा आता थेट नगरापर्यंत संत गाडगे बाबा विचार मंचचा स्तुत्य उपक्रम.
अमरावती :- अमरावती येथे कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त संत गाडगेबाबा विचार मंच सामाजिक संस्था व जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णालय अमरावती व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती सर्वज्ञ मल्टी सर्विसेस चे संचालक/गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्थेचे कोषाध्यक्ष सचिन जी वरेकर व त्यांची संपूर्ण टीम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणीचे व आधार कार्ड बनविणे यांचे आयोजन केले होते सदर शिबिराचे उद्घाटन माजी स्थायी समिती सभापती भाजपा शहर सरचिटणीस विवेक जी कलोती नगर विकास समिती सभापती व माजी नगरसेवक श्री. आशिषजी अतकरे ,सुधीरजी वाघ ,हेमंतजी श्रीवास यांच्या हस्ते करून तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली. शिबिरामध्ये विशेष उपस्थिती म्हणून हृदयरोग तज्ञ डॉ. आदित्य गुप्ता यांनी संशयित हृदय रुग्णांची तपासणी केली. याशिवाय शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब,कर्करोग लघवीशी संबंधित,आजार मूत्रपिंड आजार प्लास्टिक सर्जरी, मेंदूशी संबंधित आजार, हृदयरोग बालरोग, इत्यादी तपासणी करून संशयित रुग्णांना सुपर स्पेशलिटी शासकीय रुग्णालय येथे पुढील निदान व उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले. याचबरोबर हिंद रक्त तपासणी चमूद्वारा रक्त तपासण्या व नेत्र चिकीत्सा अधिकारी द्वारा नेत्र तपासणी करण्यात आली.सदर शिबिराकरिता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती अंतर्गत डॉ. सपना गुप्ता वैद्यकीय अधिकारी एन.सी.डी. वैद्यकीय समुपदेशक डॉ. दिनेश हिवराळे , अधिपरिचारिका प्रतिभा सोळंके, अधीपरीचरिका माधुरी खवले, बहुउद्देशीय कर्मचारी पल्लवी ठाकूर, नेत्रचिकित्सा अधिकारी श्री यावले, श्री प्रथमेश गवई फार्मासिस्ट अब्दुल, बिलिंग क्लर्क श्री.भूपेंद्र जेवडे . हिंद परिचर मीना निशानदार, वाहन चालक दीपक शर्मा, प्रयोगशाळा रक्त चाचणी तपासणी चमू इत्यादी उपस्थित होते.
शिबीराचे उत्कृष्ट आयोजन नियोजन संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय सामाजिक संस्था वल्लभनगर नं – २ चे अध्यक्ष सचिन जी नींबोकार व इतर सर्व पदाधिकारी राम बावनकर ललिता बावनकर स्वाती नींबोकार प्रतीक कोंडे सचिन वरहेकर विजय आजनकर सुभाष आद्वारे दीपक काळे शिवदास सावरकर सोनू आद्वारे सुमन काळे वानखडे मोरे गौरव पापळकर व इतर सर्व नगरवासी यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
ओबीसी मोर्चा लोकसभा संयोजक सुधीरजी वाघ यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक/ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबा मंडळ सचिव शहर व जिल्हा सचिन जी निंबोकार यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे मार्गदर्शक राम बावनकर जी यांनी केले.