स्वारगेट डेपोत फलटणला निघालेल्या एसटी बसमध्ये तरुणीवर अत्याचार, नराधम दत्ता गाडे कोण?

पुणे :- पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. पहाटे 5.30 वाजता पुण्यातील एस टी स्टँड वर धक्कादायक घटना घडली आहे. 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडली. गुन्हा घडल्यावर हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातोय.
दत्तात्रय गाडे कोण आहे?
या प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्वारगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रहदारी असते, अशातही आरोपीने या तरूणीवरती एसटी बस स्थानकामध्ये असं कृत्य केल्यानं महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
ही घटना घडल्यानंतर पुण्यात त्या तरूणीची कोणतीही मदत केली नसल्याची माहिती आहे. जेव्हा तरूणी दुसऱ्या बसने घरी पोहोचली तेव्हा तिने हि घटना घरी सांगितली. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे. आरोपी अद्याप फरार आहे. गाडे हा मूळचा शिरूरचा आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्याची नोंद आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं. 24 तास येथून बसेस जात असतात.
बसस्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. स्वारगेट बसस्थानकात ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे. हा आरोपी रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही हा प्रश्न आहे. यामुळं स्वारगेट बसस्थानाकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.