आयटी कंपनीतील महिलेला कॅब प्रवासात धक्कादायक अनुभव

पुणे :- पुण्यातील आयटी कंपनीतील महिलेला कॅब प्रवासात धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. धावत्या कारमध्ये तीच्यासोबत वाहन चालकाने नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. भेदरलेल्या महिलेने कारमधून पळ काढला आणि त्यानंतर तीने तब्बल दोन किलोमीटर जात खडकी पोलीस ठाण्यात या अतिप्रसंगाच्या प्रयत्नाची तक्रार दाखल केली. सायकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये महिलेवर झालेल्या बलात्कारामुळे महाराष्ट्राला धक्का बसला असताना या अत्याचाराच्या घटने अगोदर एक दिवस ही घटना घडली. यामुळे एकंदरच पुण्यातील महिला सुरक्षे संदर्भात प्रश्न उभा राहिला आहे.
धावत्या कारमध्ये चालकाचे नको ते कृत्य
खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या ४१ वर्षीय महिला अभियंता टेक्नोलॉजी प्रोफेशनल यांनी तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने एका प्रसिद्ध ॲग्रीगेटर ॲपद्वारे कॅब बुक केली. कल्याणीनगर येथील आपल्या कार्यालयातून सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घरी जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या.
गाडी शहदवाल बाबा चौकात पोहोचली आणि संगमवाडी रोडमार्गे पाटील इस्टेट चौकाच्या दिशेने जाऊ लागली. तेव्हा चालकाने आरसा महिलेचा चेहरा दिसेल असा सेट केला. यानंतर तो आरशात महिलेला पाहून धावत्या कारमध्ये चालक अश्लिल कृत्य करू लागला. यामुळे पिडीत महिला घाबरली. गाडी सिग्नलपाशी थांबताच तिने दरवाजा उघडून बाहेर पळ काढला. यानंतर महिलेने २ किलोमीटर धावत जात थेट खडकी पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी आरोपीबद्दल दिलेली माहितीदरम्यान कॅब चालकाने पुढे जाऊन महामार्गावर गाडी एका बाजूला थांबवली आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी महिलेकडून कॅब बुकिंगचा तपशील आणि वाहन क्रमांक घेतला. त्याआधारे कॅब मालकाचा शोध लागल्यावर चालकाला अटक करण्यात आली. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड येथे स्थलांतरीत झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक चोरमोले यांनी दिली.