गुटखा बंदीवर मंत्री नरहरी झिरवाळ यांची ठोस भूमिका

अमरावती :- राज्यात गुटखा बंदीबाबत अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे, मात्र अंमलबजावणी अपुरीच राहिली आहे. पण आता, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुटखा निर्मितीवर कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. अमरावती दौऱ्यात त्यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली. सिटी न्यूजच्या विशेष प्रश्नाला त्यांनी कसा प्रतिसाद दिला.
सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी थेट गुटखा बंदीच्या ठोस अंमलबजावणीबाबत प्रश्न विचारला असता, मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गुटखा निर्मिती करणाऱ्यांना कुठेही पायवाट मिळू नये, यासाठी कायद्यात कठोर बदल केले जातील. सरकार या मुद्द्यावर गंभीर आहे आणि लवकरच निर्णय घेतला जाईल.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, पण काळ्या बाजारातून त्याची विक्री सुरूच आहे. मात्र, आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कायद्यात बदल करून गुटखा निर्मिती आणि विक्री पूर्णतः थांबवण्याची ग्वाही दिली आहे. हा निर्णय केवळ घोषणा राहतो की प्रत्यक्षात अंमलबजावणी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.