देवेंद्र भूयारांचे मतदार संघातील विकासकामांसाठी अजित पवारांना साकडे !

मोर्शी :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी अजित पवार यांची भेट घेऊन मोर्शी विधानसभा मतदार संघातील विकासकामांची जंत्रीच अजित पवारांकडे सादर केली. शासकीय इमारती, ग्रामीण रुग्णालये इमारती, वसतिगृहे, रस्ते, पुल मोऱ्या यासह मोर्शी वरूड तालुक्यातील विविध समस्यां संदर्भात प्रश्न देवेंद्र भुयार यांनी यावेळी अजित पवारांपुढे सादर करीत मोर्शी विधानसभा मतदार संघासाठी अर्थसंकल्पात अधिकचा निधी मंजूर करण्याची मागणी केली.
यावेळी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदारसंघातील राजुरा बाजार येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय इमारतीचे बांधकाम करणे, वरुड येथे सामाजिक न्याय विभागाचे मागासवर्गीय 100 मुलांचे शासकिय वसतिगृह बांधकाम करणे, वरुड येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे बांधकाम करणे, वरुड येथे उपविभागीय अभियंता यांचे निवासस्थानाचे बांधकाम करणे, तिवसाघाट शेघाट पुसला गणेशपूर मोवाड रस्त्याची नाली व रस्ता सुरक्षासह सुधारणा करणे, वरुड शे.घाट रवाळा नागठाणा वेस्ट वेअर रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे, नागझिरी गोरेगाव करजगाव पेठ मांगरुळी रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे, झोलंबा गोरेगाव पिंपळखुटा रस्त्याची सुधारणा करणे, बेनोडा करजगाव सावंगा लोणी रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे, हिवरखेड ममदापुर लोणी रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे, सुरळी उदापूर घोराड आमनेर रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे, जरुड ते डवरगांव रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे, राममा 347 ए ते शिरपूर रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे, प्रजिमा 43 ते शिंगोरी रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे, उदापूर ते ढगा रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे, सावंगी ते आमपेंड रस्त्याची पुला सह सुधारणा करणे, चांदस ते धानोडी रस्त्याची पुला सह सुधारणा करणे, वाघाळ ते झुंज रस्त्याची पुला सह सुधारणा करणे, मांगरुळी (प्रजिमा 45) ते डवरगांव रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे, बेलोरा ते आलोडा रस्त्याची पुलासह सुधारणा करणे, इत्तामगाव ते पळसवाडा रस्त्याची पुलासह सुधारणा करणे, आमनेर ते बाभुळखेडा रस्त्याची पुलासह सुधारणा करणे, बहादा ते मांगोणा रस्त्याची पुलासह सुधारणा करणे, जरुड ते मांगोणा रस्त्याची पुलासह सुधारणा करणे, वरुड ते इसम्ब्री रस्त्याची पुलासह सुधारणा करणे, नांदगाव ते राममा 347 अे. रस्त्याची मोऱ्यासह सुधारणा करणे, टेंभूरखेडा ते भेंमडी (लहान) रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे, आमपेंड ते पोरगव्हाण रस्त्यावर पोचमार्गासह लहान पुलाचे बांधकाम करणे, एकदरा पोचमार्गावर लहान पुलाचे बांधकाम करणे. या विकास कमंसह अधिक निधी देण्याचा आग्रह माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धरला. त्यावर मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये मार्चच्या अर्थसंकल्पात ७५ कोटींचा रुपयांचा निधी बजेटमध्ये देवू, असे आश्वासन अजित पवार यांनी देवेंद्र भुयार यांना यावेळी दिले.
माजी आमदार देवेंद्र भुयार यांचे वरुड मोर्शी च्या विकासात कायम सातत्य राहले आहे त्यांचा पराभव जरी झाला असला तरी मतदारसंघाच्या विकासा बाबत त्यांची तळमळ अजूनही कायम आहे मी मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहे त्यावेळी दिनांक १० मार्च रोजी अर्थसंकल्पीय घोषणेमध्ये वरुड मोर्शी तालुक्यातील मुख्य रस्ते नुतनीकरण करणे अरुंद पूल उंच बांधणे तसेच नवीन इमारती च्या बांधकामा साठी ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तो निधी व्हाईट बुक मध्ये अंतर्भूत करण्यात येईल देवेंद्र भुयार विद्यमान आमदार जरी नसले तरी त्यांनी प्रस्तवित केलेली कामे कधीच दुर्लक्षित करणार नाही मतदारसंघातील लोकांचे हित लक्षात ठेवून देवेंद्र भुयार यांना कायम निधी दिला जाईल — अजीत पवार उपमुख्यमंत्री