LIVE STREAM

Crime NewsLatest News

नराधम दत्तात्रय गाडेला पकडून देणाऱ्याला 1 लाखांचं इनाम; पुणे पोलिसांची घोषणा

पुणे :- विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असा लौकिक असलेल्या पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर एका नराधमाने अमानुष बलात्कार केला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या पाशवी घटनेने लापुणे हादरले असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या 100 फुटांवर पोलिस चौकी, परिसरात 18 सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक असा सर्व बंदोबस्त असताना देखील नराधम, दत्तात्रय रामदास गाडे (36, रा. शिक्रापूर) या सराईत गुन्हेगाराने पीडितेच्या गैरफायदा घेत, तिच्यावर दोनवेळा अत्याचार केला. या घटनेने राज्य हादरलं आहे, दरम्यान हा प्रकरणातील नराधम आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. तर गाडेला पकडून देणाऱ्याला 1 लाखांचं इनाम जाहीर करण्यात आला आहे.

दत्तात्रय रामदास गाडे (36, रा. शिक्रापूर) या सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावरती आधी काही गुन्हे दाखल झालेले आहेत. तर दत्ता गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी एकूण 13 पथकं शोध घेत आहेत. तर या नराधम फरार आरोपी दत्ता गाडेला पकडून द्या, 1 लाख मिळवा असं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे. स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला बक्षीस जाहीर केल्याने त्याला पकडण्यात लवकर यश येण्याची शक्यता आहे. आरोपी दत्ता गाडे याच्यावर आत्तापर्यंत 7 गुन्हे दाखल आहेत.

दत्ता गाडे सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी 13 पथके तैनात केली असून, त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तसेच तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यात नोकरी करणारी तरुणी पहाटे साडेपाचच्या सुमारास फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली. बसची वाट पाहत थांबली असताना गाडेने तिला हेरले. त्याने ताई फलटणची बस येथे लागत नाही, पलीकडे लागते, असे सांगितले. मात्र, पीडितेने मी नेहमीच येथून बसते, असे म्हणत पलीकडे जाण्यास नकार दिला. त्यावर त्याने विश्वास संपादन करत तिला स्वारगेट-सोलापूर शिवशाही बसजवळ नेले. तिने बसमध्ये अंधार असल्याचे सांगितले. यावर गाडेने प्रवासी लाइट बंद करून झोपले असल्याचे सांगितले. हवे तर मोबाईलची लाइट लावून बघून ये, असे तो म्हणाला. तरुणी बसमध्ये चढताच गाडेने तिचा गळा आवळून मारण्याची धमकी देत अत्याचार केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!