नागपुरात अवैध शस्त्रसाठा उघड – समर्थ भोसले अटकेत

नागपुर :- नागपुरात अवैध शस्त्रसाठा प्रकरण उघडकीस आला आहे! पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, समर्थ भोसले यांच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला आणि त्यांच्याकडून एक देसी कट्टा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, हे शस्त्र लायसन्सवर असल्याचा दावा करत त्यांनी ते अटक आरोपीकडे गहाण ठेवल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांना माहिती मिळाली की समर्थ भोसले यांच्या घरी बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यात आले आहे. डीपी पथक पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी त्यांच्या घरी झडती घेतली आणि एक देसी कट्टा हस्तगत केला.
समर्थ भोसले यांच्याकडे लायसन्सची चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की शस्त्र लायसन्सवर आहे, पण ते सध्या चांदेकर नावाच्या अटक आरोपीकडे गहाण आहे. पोलिसांनी तातडीने समर्थ भोसले आणि चांदेकर या दोघांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास नागपूर पोलीस करत असून, हे शस्त्र आणखी कुठे वापरण्यात आले आहे का, याबाबत चौकशी सुरू आहे. आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
शस्त्र बाळगणे आणि ते अटक आरोपीकडे गहाण ठेवणे हे कायद्याच्या चौकटीबाहेरचे कृत्य आहे. नागपूर पोलिसांनी सतर्कतेने ही कारवाई केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या घटनेतील नव्या अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज!