नागपूरमधील घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश: तिघा आरोपींना अटक

नागपूर :- बातमी आहे नागपूरमधून, जिथे एसएसबी पथकाने पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मोठ्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
04 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 4:30 ते 05 फेब्रुवारी पहाटे 1:30 या वेळेत नागपूरमधील पारडी परिसरात घरफोडीची घटना घडली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून तिघा आरोपींचा शोध घेतला आणि त्यांच्याकडून ₹1,87,350/- किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले.
गुन्ह्यात सहभागी असलेल्या दिनेश यादव, कपिल शाहू आणि खुशाल शाहू यांना अटक करण्यात आली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील चौकशीसाठी पारडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी 305 (अ), 331(3), (4) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसएसबी पथकाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी चोरी उघडकीस आली असून आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास पारडी पोलीस करत आहेत. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा city news