भरधाव वेगाने धावणाऱ्या एसटी बसने दोन निरपराध म्हशींना जोरदार धडक दिली आणि त्या जागीच ठार झाल्या

यवतमाळ :- यवतमाळच्या घाटंजी मार्गावरील वडगावजवळ हा भयानक अपघात घडला! भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने दोन म्हशींना उडवले आणि त्या जागेवरच गतप्राण झाल्या! या अपघातामुळे पशुपालक दिगंबर पोटे यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे! ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर एसटी बसेस वेगमर्यादेचे पालन करत नाहीत! चालकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा अपघात होत असतात! मात्र, यावेळी निष्पाप जनावरांचा बळी गेला, आणि गरीब पशुपालकाचे मोठे नुकसान झाले!
मी गरीब माणूस आहे, माझ्या जगण्याचा आधारच सरकारच्या गाडीखाली संपला! आता माझ्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार? प्रशासन फक्त आश्वासनं देतं, पण गरीबांचे ऐकणार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया आणि खोचक प्रश्न पशुपालक दिगंबर पोटे यांनी सरकारला केला आहे.
अपघातानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत बसचालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे! दिगंबर पोटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, मात्र पुढे काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे!
गावकऱ्यांनी कित्येकदा प्रशासनाकडे मागणी केली की या मार्गावर बसचा वेग कमी करावा! पण कोणी ऐकत नाही! आज म्हशी ठार झाल्या, उद्या माणसं जातील! याला जबाबदार कोण? या घटनेनंतर एसटी महामंडळ प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार? दिगंबर पोटे यांना नुकसानभरपाई मिळेल का? आणि यापुढे असे अपघात रोखण्यासाठी प्रशासन काही पावले उचलणार का? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत!
यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी बसेसच्या बेफिकीर वेगावर आता गंभीर चर्चा होऊ लागली आहे! हा निष्काळजीपणा असाच सुरू राहिला, तर भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे!
तर पाहिलंत, यवतमाळमध्ये गरीब पशुपालकाचा जगण्याचा आधार सरकारच्या बसखाली गेला! पण प्रश्न हा आहे – अशा घटनांमध्ये गरीबांची हानी भरून काढली जाते का? प्रशासन जबाबदारी घेईल का? आणि एसटी महामंडळ अशा निष्काळजीपणाला आळा घालणार का?
अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा! धन्यवाद!